skip to main |
skip to sidebar
तुझी आठव
ण
तुझी आठवण ..........
पाकळीवरचं दव - मोती
रविकरांनी पाणी बनणारं
तुझी आठवण ...........
वार्या वरचा भीर-भीरता सुगंध
न पकडता येणारा
तुझी आठवण ............
कोमल पाकळी प्राजक्तीची
स्पर्शानेही कोमेजणारी
तुझी आठवण ...........
एक खळाळती नदी
संगमाआधीच थिजणारी
तुझी आठवण ...........
सहस्त्रकिरणं चंद्राची
शांत , शितल
तुझी आठवण ...........
सहस्त्र किरणं सुर्यचिही
प्रखर दाहक
तुझी आठवण .............
अंगार निखार्याचा
तुझी आठवण ..............
दाह पांगाऱ्याच्या फुलाचा
तुझी आठवण ...........
माझा उगावातिचा चन्द्र
तुझी आठवण ...........
आयुष्याचा मावळतिचा सूर्य
कवयित्री - माधुरी दिक्षित
Supreme!! Khuup masta lihila ahe tumhi...
ReplyDeleteBTW, Orkut varil tumchya charolya hi vachlya - tya hi atishay parinamkarak ahet! Keep it up!!