Wednesday, July 22, 2009

धुंदी

श्वासात श्वास होते
हातात हात होते
मौनात चन्द्र होता
सारेच धुंद होते ...............

गंधित रातराणी
मदमस्त केवडा हा
बहरातल्या सुखाला
साक्षीस विश्व होते .............

तू घातल्या मिठीला
सारेच गंध होते
वाटेवरी सुखाच्या
आकाश दंग होते ...............

No comments:

Post a Comment