Wednesday, July 22, 2009

आरशा समोर ग
उभी नकोच राहू तू
तुझेच रूप दर्पणी
उगी नको ग पाहू तू


उगी नको ग सोडू तू
केस मोकळे असे
लागते गडे इथे
मला असे तुझे पिसे


उगीच चांदवा तुझा
मला नको ग दाऊ तू
मीलनाची आस ही
मना नको ग लाऊ तू


उगी नकोस छेडू तू
मालकौंस जीवनी
उगी नकोस छेडू तू
मारवा तनी-मनी


गडे मला निघायचे
तुझ्या विना जगायाचे
उगीच आसवात तू
राती जागऊ नको .........



















No comments:

Post a Comment